पिचडांना जनताच धडा शिकविणार-बाळासाहेब थोरात; लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 04:41 PM2019-10-18T16:41:25+5:302019-10-18T16:41:53+5:30

पुरोगामी विचाराच्या अकोले तालुक्याने आजवर पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. मात्र त्यांनी आपल्या मूळ विचाराशीच फारकत घेऊन भाजपत प्रवेश केला आहे. शरद पवारांशीही त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे जनता आता फैसला करेल. संगमनेरचा पठार भाग पूर्ण ताकदिनीशी डॉ. किरण लहामटे यांच्यासोबत राहील, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

Balasaheb Thorat will teach a lesson to the masses; Meetings for the promotion of Lahamante | पिचडांना जनताच धडा शिकविणार-बाळासाहेब थोरात; लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

पिचडांना जनताच धडा शिकविणार-बाळासाहेब थोरात; लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

अकोले : पुरोगामी विचाराच्या अकोले तालुक्याने आजवर पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. मात्र त्यांनी आपल्या मूळ विचाराशीच फारकत घेऊन भाजपत प्रवेश केला आहे. शरद पवारांशीही त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे जनता आता फैसला करेल. संगमनेरचा पठार भाग पूर्ण ताकदिनीशी डॉ. किरण लहामटे यांच्यासोबत राहील, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 
राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी गणोरे येथे थोरात यांनी सभा घेतली. जेष्ठ नागरिक विठोबा शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. लहामटे, अशोक भांगरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, बाजीराव दराडे, विनोद हांडे, अमित भांगरे यांची भाषणे झाली.
थोरात म्हणाले, पठारभाग आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. आढळा खोºयाने आतापर्यंत सतत पुरोगामी विचारांना साथ दिली. त्यामुळेही यावेळीही मतदार कॉंग्रेस आघाडीची साथ सोडणार नाही. अमित भांगरे म्हणाले, विखे यांचे अकोले तालुक्यात होणारे आक्रमण रोखण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवा. तालुक्यातील तरुणाईने निवडणूक हातात घेतली असून डॉ. लहामटेच विजयी होतील. बाजीराव दराडे म्हणाले, बिताक्याचे पाणी देवठाण धरणाच्या लाभक्षेत्रात कधीच पोहचणार नाही. हा प्रकल्प माजी मंत्री पिचडांनीच तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होऊ दिला नाही. 
शेतक-यांचे पाणी अडवणाºयांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, विनय सावंत, के. के. मोरे, विवेक शिंदे, प्रदिप भालेराव, अशोक आंबरे, तुषार शिंदे, मच्छिंद्र सोनवणे, पाटीलबुवा सावंत, सीताबाई पथवे, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, बाळासाहेब नाईकवाडी, संदीप शेणकर उपस्थित होते.

Web Title: Balasaheb Thorat will teach a lesson to the masses; Meetings for the promotion of Lahamante

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.