महाराष्ट्र बँकेची पाच कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:22+5:302021-03-27T04:22:22+5:30

याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी सागर अंबिकाप्रसाद दुबे यांनी २५ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत ...

Bank of Maharashtra fraud of Rs 5 crore | महाराष्ट्र बँकेची पाच कोटींची फसवणूक

महाराष्ट्र बँकेची पाच कोटींची फसवणूक

याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी सागर अंबिकाप्रसाद दुबे यांनी २५ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत अशोक मवाळ, मृदूल अशोक मवाळ (सर्व रा. भिस्तबाग, अहमदनगर) यांच्यासह सावेडी सजा येथील तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे, नागापूर सजा येथील तलाठी संदीप किसन तरटे व मंडळाधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ धसाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२८ ऑगस्ट २०२० ते २९ नोव्हेंबर २०२० या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला. इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रो आर. ॲण्ड डी सेंटर ॲण्ड सोलुशन या कंपनीचे अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत अशोक मवाळ, मृदूल अशोक मवाळ हे भागीदार आहेत. त्यांच्या मालमत्तेवर कर्जाचा बोजा असतानाही त्यांनी बोजा कमी करण्यासाठी बनावट लेटरहेड व त्यावर बनावट सही शिक्का मारून सावेडी व नागापूर तलाठी कार्यालयात कागदपत्र सादर केले. तलाठी देशपांडे व तलाठी तरटे यांना हाताशी धरून मालमत्तेसंर्दभातील फेरफार बेकायदेशीरपणे मंजूर करून घेत बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक दिनकर मुंढे हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Bank of Maharashtra fraud of Rs 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.