नेवासा शहरात बाप्पाचे साधेपणाने विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 12:42 PM2020-09-02T12:42:04+5:302020-09-02T12:44:51+5:30
नेवासा : गणेश उत्सव मिरवणूक म्हटलं की दरवर्षी ढोल ताशाच्या गजर,लेझीम डावात रंगलेली मंडळातील पथके, मनाच्या गणपती समोर वाजणारे पारंपरिक वाद्य,शहरात वाजत गाजत निघणाऱ्या मिरवणूका यामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.मात्र यावर्षी शहर तसेच तालुक्यात झपाट्याने वाढणारा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला गेला.

मंगळवारी सकाळ पासूनच नगरपंचायतकडून शहरातील विविध भागात सजवलेल्या तीन ट्रॅक्टरमधून तब्बल बाराशे घरगुती गणपती तर सतरा सार्वजनिक मंडळाचे गणपती शहरातील गणपती घाटावर आणून नगरपंचायत कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी आरती करून दहा दिवसांच्या गणरायाला निरोप दिला.
शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार रुपेश सुराणा,पोलीस निरीक्षक रणजित डेरे,नगरपंचायत मुख्याधिकारी समीर शेख तसेच नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.