महापालिकेच्या सभागृहात बसकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:03 PM2018-08-04T12:03:23+5:302018-08-04T12:03:52+5:30

गेल्या सात वर्षांपासून संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम रखडले आहे. शिल्पकाराचे दोन लाख रुपये देण्यास नाहीत, ही लाजीरवानी बाब आहे.

Basakan in the Municipal Hall | महापालिकेच्या सभागृहात बसकन

महापालिकेच्या सभागृहात बसकन

अहमदनगर : गेल्या सात वर्षांपासून संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम रखडले आहे. शिल्पकाराचे दोन लाख रुपये देण्यास नाहीत, ही लाजीरवानी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका आवारात उभारण्याचे कामही सुरू नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात ‘संविधान अभ्यास केंद्र’ उभारण्याच्या कामासाठी खुद्द जिल्हाधिकारी यांनीच आडकाठी आणल्याचा आरोप सदस्यांनी अप्रत्यक्षपणे केला. पुतळ््याच्या कामासाठी धनादेश देण्याची मागणी करीत सर्वच नगरसेवकांनी खुर्च्या सोडून जमिनीवर बसकन् मारली.
भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याने सभेत हजेरी लावल्याने गोंधळात गुरुवारीतहकूब झालेली सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता सुरू झाली. या सभेत छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या ठरावाचे इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय सभेसमोर होता. त्याचा आधार घेत कुमारसिंह वाकळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे काय झाले, यावरून प्रशासाला तब्बल अर्धा ते एक तास धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली. त्यावरून सर्वच सदस्य संतप्त झाले. महापौर सुरेखा कदम यांनी अभियंता कल्याण बल्लाळ आणि सुरेश इथापे यांची पुतळा उभारणीच्या कामासाठी नियुक्ती केली. एक महिन्यात त्यांनी पुतळा उभारण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश महापौरांनी दिला.
त्यानंतर संभाजी महाराज यांच्या पुतळ््याचा विषय चर्चेला आला. शिल्पकाराचे दोन लाख रुपये देण्यासाठी एका अधिकाºयाने दोन टक्के मागितल्याचा आरोप अनिल शिंदे यांनी केला. तर पुतळ््यासाठी अद्याप जागा निश्चित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यावरून सभेत गदारोळ झाला. सर्वच नगरसेवकांनी अधिकाºयांना धारेवर धरले. पुतळ््यासाठी शिल्पकाराचे दोन लाख रुपये थकले आहेत. त्याचा धनादेश येईपर्यंत सर्व सदस्य जमिनीवर बसतील, असा पवित्रा घेत सर्वच नगरसेवकांनी बसकन् मारली. धनादेश देण्याची कार्यवाही होत असल्याचे महापौरांनी सांगताच सर्व सदस्य पुन्हा आपापल्या जागी येवून बसले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाचे सुशोभिकरण व संविधान अभ्यास केंद्र करण्यात येणार आहे. त्यासाठी सात लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र यासाठी धनादेश काढण्यास प्रभारी आयुक्तांनीच नकार दिल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण मानकर यांनी स्पष्ट केले. ज्यांनी संविधान लिहिले त्यांच्या स्मारकासाठी महापालिका पैसे देवू शकत नाही, याबाबत सदस्यांनी निषेध केला.

वाकळे-सातपुते यांच्यात खडाजंगी
अमृत योजनेसाठी जमिन संपादित करण्याचा विषय फायद्याचा होता म्हणून मंजूर केल्याचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. सातपुते हे महापौरांना आदेश देत असल्याने वाकळे भडकले. तुम्ही सभा चालवू नका, सभा ही कोणाची मक्तेदारी नाही, अशा शब्दात त्यांनी ठणकावले. कोणाचे हितसंबंध गुंतलेले असतील तर विषय मंजूर करू नका, असे वाकळे म्हणताच सातपुते यांचाही पारा चढला. दिलीप सातपुते व सभापती वाकळे यांच्यातील जोरदार खडाजंगी पाहून सभागृह अवाक झाले. सभेनंतरही ते दोघे हमरीतुमरीवर आले. मात्र त्यांना अभय आगरकर यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.

महापौरांना काय कळते?
अमृत योजनेच्या कामासाठी एमआयडीसी परिसरातील काही जमीन संपादित करण्याचा विषय स्थगित केलेला असताना ते इतिवृत्तामध्ये मंजूर करण्यात आला आहे, असा आक्षेप नगरसेवक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी स्वपक्षाच्या महापौरांवरच घेतला. यावर सातपुते यांनी बोलताना महापौरांकडे दहा दहा विषय येतात, महापौरांना काय कळते? असे वक्तव्य करीत स्वपक्षाच्या महापौरांवरच टीका केली. त्यामुळे महिलांचा अवमान होत असल्याचे सांगत सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे यांनी सातपुते यांना लक्ष्य केले. सातपुते यांनी सभागृहात माफी मागण्याची सदस्यांनी मागणी केली. त्यावर सातपुते यांनी माफी मागितली आणि गोंधळ शमला.

Web Title: Basakan in the Municipal Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.