कोरड्या नदीतच रंगली लढाई : बरोबरीची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:20 PM2018-09-11T13:20:05+5:302018-09-11T13:20:12+5:30
नगर तालुक्यातील शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई सोमवारी पावसाअभावी कोरड्या नदीतच रंगली.
केडगाव : नगर तालुक्यातील शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई सोमवारी पावसाअभावी कोरड्या नदीतच रंगली.
लढत बरोबरीत सोडविण्याची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली. लढत पाहण्यासाठी दोन्ही गावांसह आसपासच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी शेंडी व पोखर्डी या दोन गावातून वाहणाºया सीना नदीच्या पात्रात ही लढाई लढली जाते. मात्र यावर्षी पुरेसा पाऊस नसल्याने या नदीला पाणी नाही. त्यामुळे कोरड्याठाक नदीतच ही लढाई लढविण्यात
आली. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सोमवारी सायंकाळी दोन्ही गावांमधील महिलांनी गौराईची मिरवणूक काढली. त्यानंतर गौराईची पूजा करून तिचे विसर्जन करण्यात आले. दोन्ही गावातील महिला नदी पात्रात एकत्र जमल्यानंतर लढाईला सुरूवात झाली. एकमेकींना शिव्यांची लाखोली, ओढाओढी , बोटे मोडणे यामुळे लढाई रंगली. नंतर लढाई बरोबरीत सोडविण्यात आली. नदी पात्रात पाणी नसल्याने लढाईत निरूत्साह जाणवत होता.
शिव्यांची लाखोली, ओढाओढी