सावधान! ४० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळे

By Admin | Published: May 30, 2014 11:28 PM2014-05-30T23:28:02+5:302014-05-31T00:24:44+5:30

अहमदनगर: तंबाखूची सहज उपलब्धता, पालकांचे दुर्लक्ष आणि तरुणांच्या खिशात खुळखुळणारा पैसा, यामुळे तरुण तंबाखूच्या आहारी जात असून, सर्वाधिक ४० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळेच होतात,

Be careful! 40 percent of cancers due to tobacco consumption | सावधान! ४० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळे

सावधान! ४० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळे

अहमदनगर: तंबाखूची सहज उपलब्धता, पालकांचे दुर्लक्ष आणि तरुणांच्या खिशात खुळखुळणारा पैसा, यामुळे तरुण तंबाखूच्या आहारी जात असून, सर्वाधिक ४० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळेच होतात, असे कॅन्सर तज्ज्ञांचे म्हणणे आहे़ जगात दरवर्षी यामुळे कॅन्सरचा आजार होणार्‍यांची संख्या १२ लाखांच्या घरात आहे़ तंबाखू सेवनाची ही आकडेवारी चक्रावून टाकणारी असल्याने त्यावर जनजागृती हाच, एकमेव रामबाण उपाय असल्याचे जाणकारांचे मत आहे़ शासनाने गुटखा व पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली़ मात्र तंबाखू विक्रीवर कोणतीही बंदी नाही़ ती सेवन करणे, आरोग्यास घातक आहे़ असे असले तरी तंबाखू बाजारात सहज उपलब्ध होते़ रस्त्यांच्या दुतर्फा फुटा-फुटावर पान टपर्‍या पाहायला मिळतात़ पान टपर्‍यांवर सिगारेट आणि तंबाखू घेण्यासाठी अक्षरश: गर्दी होते़ सकाळी घरातून निघाल्यानंतर अनेकांचा पहिला स्टॉप पान टपरीवर असतो़ सिगारेट, तंबाखूची पुडी आणि मावा घेतल्याशिवाय अनेकजण पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्याचे धाडस करत नाहीत़ इतकी तंबाखू महत्वाची झाली असून, तरुण वर्ग यात सर्वात पुढे आहे़ तंबाखूमुळे कॅ न्सर होतो, हे एखाद्या कार्यालयात काम करणार्‍याला माहिती नाही, असे नाही़ परंतु तंबाखू सेवनाची सवयच त्यांना टपरीपर्यंत घेऊन जाते़ महागडी सिगारेट ही महाविद्यालयीन तरुणांमध्ये तर एकप्रकरची फॅशनच झाली आहे़ कोणती सिगारेट ओढतो, त्यावरून त्याचे स्टेटस ठरते़ महाविद्यालयीन तरुणांमध्ये हे फॅड अधिक असून, त्यांना मिळणार्‍या पॉकीटमनीवर ते ठरते़ पालक मुलाला पॉकीटमनी देतात़ पण तो हे पैसे नेमके कशासाठी खर्च करतो, हे तपासण्याची तसदी घेत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे़ तंबाखू खाण्यातून व सिगारेटमधून घेण्याची पध्दत आहे़ तंबाखूत निकोटीन असते़ निकोटीनचे शरीरातील प्रमाण वाढल्यास विविध प्रकारच्या कॅन्सरचे आजार जडतात़ तंबाखू चघळणार्‍यांना तोंड, जठर आणि अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते़ सिगारेट घेणार्‍यांना फुफ्फु स, रक्त आणि हृदयाचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते़ तंबाखू आरोग्यास घातक आहे, हे सर्वश्रुत आहे़ परंतु त्याची पर्वा न करता सर्रास तंबाखूचे सेवन केले जात आहे़ तंबाखूच्या आहारी जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, तंबाखू सेवनाविरोधात जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे़ चोरी छुपके... शाळा व महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे़ गुटखा व पान मसाला विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे़परंतु तरीदेखील चोरट्या मार्गाने विक्री सुरू आहे़ उपाय: जनजागृती करणे सर्व विभागांचा समन्वय पोलिसांना अधिकार पालकांनी घ्यावयाची काळजी पॉकीटमनीवर लक्ष मुलांच्या हालचालींवर लक्ष खर्चाचा हिशोब घ्यावा मित्रांचीही माहिती ठेवावी. ही आहेत लक्षणे तोंडात पांढरा चट्टा लाल चट्टा बरी न होणारी जखम तोंडात गाठ येणे तंबाखू सेवन करणे, आरोग्यास घातक आहे़परंतु तरीदेखील सर्रास सेवन केले जात असून, त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे़ बंदीपेक्षा नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे़ सेवन करणार्‍यांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे़तसेच शासनाने याविषयी जनजागृती करावी़ - डॉ. सतीश राजूरकर, आरोग्य अधिकारी महापालिका

Web Title: Be careful! 40 percent of cancers due to tobacco consumption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.