शेतीच्या वादातून मारहाण; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:17 PM2020-06-24T15:17:35+5:302020-06-24T15:18:18+5:30
शेतीच्या वादातून एका महिलेसह चार जणांना काठ्या व फावड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (१९ जून) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अकलापूर येथील शेळकेवाडीत घडली.
घारगाव : शेतीच्या वादातून एका महिलेसह चार जणांना काठ्या व फावड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (१९ जून) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अकलापूर येथील शेळकेवाडीत घडली.
मारहाण करणारे हे पुणे जिल्ह्यासह संगमनेर व अकोले तालुक्यातील आहेत. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (२२ जून) रात्री उशीरा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ शंकर तळपे (वय ३५, रा. शेळकेवाडी, अकलापूर, ता.संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ दादाभाऊ नरवडे, नवनाथ नरवडे याचा भाऊ, दादाभाऊ नरवडे (सर्व रा. आंबीदुमाला, ता. संगमनेर), नवले (पूर्ण नाव माहित नाही, रा. बेलापूर बदगी, ता.अकोले) व इतर चार अनोळखी व्यक्ती तसेच रवींद्र सहादू सोनवणे (रा.चाळकवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दादाभाऊ नरवडे याला मंगळवारी (२३ जून) पोलिसांनी अटक केली. दरम्यान जखमी झालेल्या चौघांवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.