शेतीच्या वादातून कु-हाडीने मारहाण; पाच जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 03:45 PM2020-05-18T15:45:31+5:302020-05-18T15:46:15+5:30
शेत नांगरल्याच्या कारणातून एकास कु-हाड, काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि.१६ मे) रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा (तांगडी) येथे घडली.
घारगाव : शेत नांगरल्याच्या कारणातून एकास कु-हाड, काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि.१६ मे) रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा (तांगडी) येथे घडली.
आंबीखालसा गावालगत असलेल्या तांगडी या ठिकाणी पोपट नानाभाऊ तांगडकर हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती मशागतीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री साडेदहा ते पावणे आकरा वाजेच्या दरम्यान पोपट तांगडकर यांनी सुरेंद्र देवराम तांगडकर यांचा भाऊ राजेंद्र देवराम तांगडकर यांचे शेत नांगरल्याच्या कारणावरून सुरेंद्र देवराम तांगडकर, प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशिराम तांगडकर, मच्छिंद्र देवराम तांगडकर (सर्व रा. तांगडी,आंबी खालसा) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पोपट तांगडकर यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. पोपट तागडकर हे ते बेशुद्ध पडल्याने त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी पोपट तांगडकर यांचा मुलगा सागर तांगडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील सहा जणांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे करीत आहेत.