सुंदर गाव, तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे रविवारी वितरण; जिल्ह्यात ३३ सुंदर गावांची निवड, ५५ ग्रामसेवकांचा होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:39 PM2023-06-29T22:39:53+5:302023-06-29T22:40:13+5:30

आता एकत्रित २०१८-१९ ते २०२१-२२ या चार वर्षांतील एकूण ५५ ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Beautiful Village, as well as distribution of Adarsh Gram Sevak Award on Sunday; Selection of 33 beautiful villages in the district | सुंदर गाव, तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे रविवारी वितरण; जिल्ह्यात ३३ सुंदर गावांची निवड, ५५ ग्रामसेवकांचा होणार सन्मान

सुंदर गाव, तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे रविवारी वितरण; जिल्ह्यात ३३ सुंदर गावांची निवड, ५५ ग्रामसेवकांचा होणार सन्मान

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागांतर्गत गत चार वर्षांपासून रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, तसेच आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण रविवारी (२ जुलै) पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामसेवकांच्या कामांचे मूल्यमापन होऊन गावची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी, याकरिता शासनाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना आणली. परंतु, कोरोनामुळे गत चार वर्षांपासून जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवकांचे वितरण केले नव्हते. केवळ घोषणा झालेली होती. आता एकत्रित २०१८-१९ ते २०२१-२२ या चार वर्षांतील एकूण ५५ ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रविवारी (२ जुलै) सकाळी ११ वाजता सावेडीतील बंधन लाॅन येथे या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करत आहेत.

पुरस्कार्थी ग्रामसेवक असे
सन २०१८-१९ : कुमार गणगे, हितेश ढुमणे, तानाजी पानसरे, संदीप शेटे, प्रतिभा पागिरे, संपत गोल्हार, अनिल भोईटे, माधवी बेंद्रे, किशोर टकले, सतीष मोटे, सचिन थोरात, सुनील दुधाडे, सुनील राजपूत.

सन २०१९-२० : एकनाथ ढाकणे, संगीता देठे, दिलीप नागरगोजे, प्रदीप आसणे, वैशाली बोरूडे, रामदास कार्ले, रवींद्र बोर्से, कृष्णदास अहिरे, विशाल काळे, नीलेश टेकाळे, आसाराम कपिले, उजाराणी शेलार, भाऊसाहेब पालवे, भय्यासाहेब कोठुळे.

सन २०२०-२१ : शिवाजी फुंदे, नसिम सय्यद, रमेश भालेराव, नंदा डामसे, गोपीचंद रोढे, प्रताप साबळे, गणेस पाखरे, संदीप लगड, गौतम जानेकर, स्वाती घोडके, मधुकर दहिफळे, शशिकांत नरोडे, अविनाश पगारे, सुधीर उंडे.

सन २०२१-२०२२ : सोपान बर्डे, राजेंद्र साखरे, रामदास गोरे, महेश शेळके, सुप्रिया शेटे, ललिता बोंद्रे, सुनील नागरे, वनिता कोहकडे, शशिकांत चौरे, सारिका मेहेत्रे, योगेश देशमुख, प्रियंका भोर, संजय दुशिंग, अर्जुन साबळे.

आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार २०२१-२२
जिल्हास्तर : संवत्सर (ता. कोपरगाव) व थेरगाव (ता. कर्जत) यांना विभागून.
तालुकास्तर - वीरगाव (अकोले), वेल्हाळे (संगमनेर), संवत्सर (कोपरगाव), बाभळेश्वर (राहाता), बेलापूर बु. व उंदिरगाव (श्रीरामपूर), तांदूळनेर (राहुरी), खुपटी (नेवासा), वडुले बु. (शेवगाव), येळी (पाथर्डी), मोहरी (जामखेड), थेरगाव (कर्जत), निमगाव खलू (श्रीगोंदा), मांडवे खु. (पारनेर), कोल्हेवाडी (नगर).

आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार २०२२-२३
जिल्हास्तर- आश्वी बु. (ता. संगमनेर) व वडगाव गुप्ता (ता. नगर) यांना विभागून.
तालुकास्तर - विठा (अकोले), आश्वी बु. (संगमनेर), सडे (कोपरगाव), लोहगाव (राहाता), ब्राह्मणगाव वेताळ (श्रीरामपूर), दवणगाव (राहुरी), खामगाव (नेवासा), दहिगावने (शेवगाव), करंजी (पाथर्डी), फक्राबाद (जामखेड), खांडवी (कर्जत), मुंगूसगाव (श्रीगोंदा), हत्तलखिंडी (पारनेर), वडगाव गुप्ता (नगर).
 

Web Title: Beautiful Village, as well as distribution of Adarsh Gram Sevak Award on Sunday; Selection of 33 beautiful villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.