१४ गावांना सुंदर गाव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:49+5:302021-02-16T04:22:49+5:30
मुश्रीफ यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ...
मुश्रीफ यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले असतील.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर उपस्थित राहणार आहेत.
तालुकास्तरीय पुरस्कारासाठी डोंगरगाव (अकोले), निमगाव बु (संगमनेर), करंजी (कोपरगाव), जाफराबाद आणि मुठेवडगाव विभागून (श्रीरामपूर), खडकेवाके (राहाता), सडे (राहुरी), वडाळा बहिरोबा (नेवासा), राक्षी (शेवगाव), चिचोंडी (पाथर्डी), खर्डा (जामखेड), कानगुडवाडी व कोपर्डी विभागून (कर्जत), मढेवडगाव (श्रीगोंदा), जामगाव (पारनेर), टाकळी खातगाव (नगर) यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर २०१८-१९ साठी ग्रामपंचायत खडांबे (ता. राहुरी) आणि वाळवणे (ता. पारनेर) यांची विभागून निवड करण्यात आली आहे. २०१९-२० साठी गणोरे ग्रामपंचायत (ता. अकोले) आणि आव्हाणे बु (ता. शेवगाव) विभागून, २०२०-२१ साठी निमगाव बु ग्रामपंचायत (संगमनेर) आणि खडकेवाके (ता. राहाता) यांची विभागून निवड करण्यात आली आहे.