संगमनेरच जिल्ह्याचे ठिकाण व्हावे

By Admin | Published: July 31, 2016 11:48 PM2016-07-31T23:48:40+5:302016-07-31T23:50:36+5:30

संगमनेर : जिल्हा विभाजनाबाबत राज्य शासनाकडून सुतोवाच करण्यात आल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या हालचाली वाढल्या आहेत.

To become the venue of Sangamner district | संगमनेरच जिल्ह्याचे ठिकाण व्हावे

संगमनेरच जिल्ह्याचे ठिकाण व्हावे

संगमनेर : जिल्हा विभाजनाबाबत राज्य शासनाकडून सुतोवाच करण्यात आल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या हालचाली वाढल्या आहेत. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर हेच व्हावे यासाठी संगमनेर जिल्हा कृती समितीने एका अल्बमचे रविवारी प्रकाशन केले. जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी संगमनेरात असल्याचे या अल्बममधून प्रभावीपणे मांडण्यात आले असून हा अल्बम मुख्यमंत्री, महसूलमंत्री व पालकमंत्री यांना लवकरच देण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे विभाजन करून नवीन जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर येथे करावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. मात्र संगमनेर की श्रीरामपूर या वादात जिल्हा विभाजनाचा प्रश्न रेंगाळत पडला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. राज्य सरकार जिल्हा विभाजनाला अनुकूल असल्याने जिल्हा विभाजनाच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत.
जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबी संगमनेरात उपलब्ध असल्याने संगमनेर येथेच जिल्ह्याचे मुख्यालय करावे, अशी मागणी संगमनेर जिल्हा कृती समितीने वेळोवेळी केली आहे. यासाठी राज्य सरकारकडे करावा लागणारा पाठपुरावा मात्र केला जात नव्हता. भारतीय जनता पक्षाचे नेते राजेश चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी पाठपुरावा करून एक अल्बम बनविला आहे.
संगमनेरच जिल्हा का झाला पाहिजे हे पटवून देण्यासाठी ५१ मुद्द्यांचा उल्लेख या अल्बममध्ये करण्यात आला आहे. नवीन जिल्ह्यासाठी लागणारी जागा, विविध कार्यालयासाठी लागणाऱ्या इमारती, पाणी पुरवठा, संगमनेरपासून जवळच्या तालुक्यांचे अंतर आदी बाबींचा समावेश या अल्बममध्ये आहे.
अल्बम प्रकाशनवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर तारी, भाजपचे राजेश चौधरी, संजय नाकील, किशोर कालडा, उमर बेग, शौकत जहागीरदार, प्रकाश कलंत्री, सीताराम मोहरीकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: To become the venue of Sangamner district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.