निंबोडी शाळा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:00 PM2017-12-20T14:00:34+5:302017-12-20T18:57:08+5:30

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ...

To begin the fast-unto-death fasting for the Nimbodi school accident, students should get justice | निंबोडी शाळा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरु

निंबोडी शाळा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरु

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी निंबोडी येथे चर्मकार उठाव संघाच्यावतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
२८ आॅगस्ट २०१७ रोजी निंबोडी शाळेची इमारत कोसळली होती़ त्यात सुमित भिंगारदिवे, श्रेयस रहाणे, वैष्णवी पोटे या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर पाच विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. या विद्यार्थ्यांची जबाबदारी शासनाने स्वीकारावी तसेच त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी चर्मकार उठाव संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोहन पोटे यांनी निंबोडी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात अशोक कानडे, सुनील भिंगारदिवे, प्रविण रहाणे, अशोक पवार, प्रवाश वाघ, भास्कर शेंडगे, महादेव भिंगारदिवे यांनी सहभाग घेतला आहे.

Web Title: To begin the fast-unto-death fasting for the Nimbodi school accident, students should get justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.