भंडारदा-यातील काजवा महोत्सवास सुरुवात
By Admin | Published: May 29, 2017 10:57 AM2017-05-29T10:57:18+5:302017-05-29T10:57:18+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित केल्या जात असलेल्या काजवा महोत्सवात सुरुवात झाली आहे.
ल कमत न्यूज नेटवर्क भंडारदरा (अहमदनगर) : महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित केल्या जात असलेल्या काजवा महोत्सवात सुरुवात झाली आहे. यंदा काजवा महोत्सव- २०१७ चे आयोजनास वनविभाग, पोलिस यंत्रणा, स्थानिक गाईड व आदिवासी बांधव, हॉटेल व्यवसायिकयांचे सहकार्य लाभत आहे . काजवा महोत्सव बघण्यासाठी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. सर्व हॉटेल आधीच बुक झाले आहेत. स्थानिक तरुणांनी उभारलेल्या तंबू (टेंन्ट) मध्ये राहून निसर्गाचा आनंद घेत आहेत. दरवर्षी काजवे मे महिन्याच्या मध्यांतरापासून दिसण्याास सुरुवात होते. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ या झाडांवर मोठ्या प्रमाणात दिसतात. परिसरातील मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल,भंडारदरा या परिसरात मोठया प्रमाणात पाहावयास मिळतात. हे चमचमणारे दृश्य पाहून भारावून जात असून या नयनरम्य दृश्यांचे फोटो काढत आहेत. भंडारदरा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या परिसरात वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. काजवा महोत्सव येणा-या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदरा परिसरातील हॉटेल सज्ज झाली आहेत. काजवा पाहवयास येणारे पर्यटक घरगुती जेवनाचा आनंद घेत आहेत. झुणका -भाकरी व मिरचीचा ठेचा या मेजवाणीचा आस्वाद घेत आहेत. अनेक स्थानिक तरुणांनी स्टॉल उभे केले आहेत. हातसडीचे तांदूळ, नाचणी, वरी अशा विविध धान्यांचे स्टॉल लावून विक्री केली जात आहे. जंगली वनस्पती, जंगली पालेभाज्या, तसेच बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचीही वक्री केली जात आहे.