नगर - कल्याण महामार्गावर टोल उभारणीला सुरुवात
By Admin | Published: May 16, 2017 01:04 PM2017-05-16T13:04:43+5:302017-05-16T13:04:43+5:30
नगर - कल्याण महामार्गावर काळू धरण पुलाजवळ टोल उभारणीला सुरुवात
ल कमत न्यूज नेटवर्क टाकळी ढोकेश्वर((अहमदनगर) - नगर - कल्याण महामार्गावर काळू धरण पुलाजवळ टोल उभारणीला सुरुवात केली असून यामुळे वाहनचालकांच्या खिशाला झळ पोसली जाणार असून टोल वसुलीला टाकळी ढोकेश्वर परिसरातील गावानं मधील वाहन चालकांचा याला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने नगर कल्याण महामार्गासाठी २०० कोटी रुपयांच्यावर निधी रस्त्यासाठी खर्च केला असून हे काम अशोक बिल्डकॉन या कंपनीला देण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तुरळक ठिकाणी छोटी मोठी रस्त्याचे कामे तसेच बाह्य वळणाची कामे बाकी असून थोड्याच दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्या नंतर हा राष्ट्रीय महामार्ग केंद्र शासनाकडे हस्तांतरित ठेकेदार करणार आहे. त्यानंतर महामार्गावरील टोल वसुलीसाठी निविदा काढण्यात येणार असून जास्त बोली लावणारास टोल वसुलीचे काम देण्यात येणार आहे.महामार्गाला जोडणाऱ्या गावान संबधी कोणतेही दिशादर्शक फलक तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी शौचालय ही बांधण्यात आली नाही.या प्रमुख सुविधा प्रवाशांसाठी ठेकेदाराला बंधनकारक आहेत. नव्या शासकीय धोरणा नुसार किलोमीटरनुसार टोल वसुली कि वाहनानुसार टोलआकारणी केली जाते याकडे सर्व वाहन चालकांचे लक्ष लागून राहिले आहे.