बेलवंडीकर म्हणतात कोरोना लस मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:14+5:302021-08-23T04:24:14+5:30

बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे; मात्र बेलवंडी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ...

Belwandikar says will corona be vaccinated? | बेलवंडीकर म्हणतात कोरोना लस मिळेल का?

बेलवंडीकर म्हणतात कोरोना लस मिळेल का?

बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे; मात्र बेलवंडी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे गावकरी कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का? अशी विचारणा करीत आहेत. गावातील तरुणांनी नुकतीच अपर तहसीलदार चारुशीला पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांची भेट घेऊन लसीकरण वाढविण्याची मागणी केली.

बेलवंडी गावाची लोकसंख्या १२ हजार आहे. आतापर्यंत १ हजार कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये २१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरण सुरू आहे; मात्र बेलवंडीकर लस घेण्यात मागे आहेत. कोरोनाला लगाम घालण्यासाठी लसीकरण वाढविणे गरजेचे आहे, असे निवेदन राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष निखिल क्षीरसागर, सुनील ढवळे, अश्रूदिन हवालदार, नितीन लाला हिरवे, अशोक लाढाणे, सुनील धनवडे यांनी दिले आहे.

-----

२२ बेलवंडी

Web Title: Belwandikar says will corona be vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.