बेणके, सदगीर यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 AM2021-02-27T04:26:29+5:302021-02-27T04:26:29+5:30
शालेय पातळीवर कुस्तीचे डावपेच शिकत असताना गणेश बेणके आणि भाऊराव सदगीर या विद्यार्थ्यांनी शालेय पातळीवरील कुस्तीचे मैदाने गाजवली. गणेश ...
शालेय पातळीवर कुस्तीचे डावपेच शिकत असताना गणेश बेणके आणि भाऊराव सदगीर या विद्यार्थ्यांनी शालेय पातळीवरील कुस्तीचे मैदाने गाजवली. गणेश बेणके हा मागील वर्षी शालेय कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पोहचला होता. गणेश याने काही दिवस अकोले येथील कुस्ती केंद्रात सराव केला. यानंतर हे दोघेही विद्यार्थी भगूर (नाशिक) येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बलकवडी येथे कुस्तीचे धडे गिरवत आहेत. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संपत धुमाळ यांचे विद्यालयात तर बलकवडी येथे गोरखनाथ बलकवडे यांचे मार्गदर्शन या दोघांना लाभत असल्याचे प्राचार्य एल. पी. परबत यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध वजनी गटातील कुस्तीपटूची बलकवडी येथे निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र केसरी विजेते हर्षवर्धन सदगीर यांनी कोच म्हणून काम पाहिले. झालेल्या या निवड चाचणीत बेणके आणि सदगीर या कुस्तीपटूनची पुणे येथील बालेवाडी मैदानावर होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली.
सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव देशमुख, विश्वस्त विवेक मदन, सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, व्यवस्थापक प्रकाश महाले यांनी कौतुक केले.
फोटो आहे