‘अमृतवाहिनी’ला ‘सर्वोत्कृष्ट संलग्न महाविद्यालय’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:04+5:302021-02-13T04:20:04+5:30

विद्यापीठाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (दि. ११) विद्यापीठात आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे, ...

‘Best Affiliated College’ award to ‘Amritvahini’ | ‘अमृतवाहिनी’ला ‘सर्वोत्कृष्ट संलग्न महाविद्यालय’ पुरस्कार

‘अमृतवाहिनी’ला ‘सर्वोत्कृष्ट संलग्न महाविद्यालय’ पुरस्कार

विद्यापीठाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (दि. ११) विद्यापीठात आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमृतवाहिनी संस्थेच्या विश्‍वस्त शरयू देशमुख यांनी तो स्वीकारला. तीन लाख रूपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयास दुसऱ्यांदा मिळाला असून या पूर्वी २००९-२०१० मध्ये तो मिळाला होता.

संस्थेचे विश्‍वस्त अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमरानी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा. अशोक मिश्रा यांसह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक लवचिकता, टिचींग व लर्निंग प्रोसेसमध्ये माहिती-संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर, सतत नाविण्यपुर्ण उपक्रम, उत्कृष्ठ शैक्षणिक निकालाची परंपरा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प, प्रकाशने, औद्योगिक जगताशी सहयोग व कन्सल्टंन्शी प्रकल्प, सुसज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा याबरोबरच संस्थेत दरवर्षी होणारे शंभर टक्के प्रवेश, आर्थिक सक्षमता, वेळोवेळी आयोजित केले जाणारे चर्चासत्रे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा, विद्यार्थी केंद्रीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, विद्यापीठातील रँक धारकांची संख्या, पी़ एच़ डी़ व पदव्युत्तर शिक्षणधारक अनुभवी शिक्षकांची मुबलक संख्या यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

Web Title: ‘Best Affiliated College’ award to ‘Amritvahini’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.