युवक काँग्रेसतर्फे ‘विश्वासघात आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:36 AM2021-02-18T04:36:02+5:302021-02-18T04:36:02+5:30
देशात इंधनाची सातत्याने दरवाढ सुरू असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यभर आंदोलन ...
देशात इंधनाची सातत्याने दरवाढ सुरू असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. संगमनेर शहरात झालेल्या आंदोलनात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, प्रा. बाबा खरात, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन खेमनर, उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, शहराध्यक्ष निखिल पापडेजा, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, शहर कार्याध्यक्ष शेखर सोसे, शहराध्यक्ष हैदरअली सय्यद यांसह श्रेयस कर्पे, अक्षय दिघे, रमेश दिघे, विजय उदावंत, सुमित वाघमारे, दत्ता वाकचौरे, मोहन गुंजाळ, गोपी जहागीरदार, हर्षल रहाणे, सनी ठोंबरे, जयेश जोशी, रमेश गफले आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किमती वाढत असून सरकारने जनतेची लूट चालवली आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरसुद्धा ५० रुपयांनी महागले आहेत. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करणार हे आश्वासन दिले होते. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला.
इंधनाची होणारी दरवाढ म्हणजे मोदींनी सामान्य जनतेचा केलेला विश्वासघात आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.