विहीरीतून बिबट्या पिंज-यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 06:09 PM2018-07-24T18:09:34+5:302018-07-24T18:10:55+5:30

पारनेर तालुक्यातील तिखोल येथील काळूनगरमधील विहीरीतील बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले.

Between the wells of the leopard | विहीरीतून बिबट्या पिंज-यात जेरबंद

विहीरीतून बिबट्या पिंज-यात जेरबंद

ठळक मुद्दे१५ दिवसापासून वास्तव्य - वनविभागाला आले यश

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील तिखोल येथील काळूनगरमधील विहीरीतील बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले.
तिखोल(ता.पारनेर)येथील काळूनगर मध्ये बबन ठाणगे यांच्या शेतामधील विहीरीत मंगळवार (दि.२४) रोजी बिबट्या आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहीती तातडीने टाकळी ढोकेश्वरच्या वनविभागाला कळविली. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या पहाटेच्या दरम्यान पडला असावा असे ठाणगे यांनी सांगितले. वनविभागाच्या कर्मचारी तातडीने घटनास्थळी जावून पाहणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी किसन आगलावे यांच्या सुचनेनुसार वडगाव सावताळ येथून तातडीने पिंजरा आणून जेसीबीच्या साहयाने विहीरीत पिंजरा लावला. मात्र काही वेळातच हा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी निश्वास सोडला.
बबन ठाणगे, पोपट मंचरे, भाऊसाहेब ठाणगे, वनपरिक्षेत्र अधिकारी किसन आगलावे, वनपाल दिनकर मुरूमकर, वनरक्षक नाना जाधव, शेख, वैभव गाढवे, अमोल गोसावी, सुरेश पन्हाळे, वनकर्मचारी सुदाम व्यवहारे यांनी परीश्रम घेतले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बाळकृष्ण शेळके यांनी अहवाल दिल्यानंतर वडगाव सावताळ येथील रोपवाटीकेत पिंज-यात ठेवण्यात आले. बिबट्याचा मुक्काम हलविण्यात येणार आहे.

अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने अन्नाच्या शोधात परिसरात मुक्काम ठोकला होता. या ठिकाणी दाट झाडी असल्याने मोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. मोरांवर उपजिवीका करणा-या या बिबट्याला गागरे वस्ती वडगाव सावताळ रोड(टाकळी ढोकेश्वर) येथे स्थानिक ग्रामस्थांनी पाहील्याने परिसरात घबराटीचे वातावरण होते. मात्र मंगळवार (दि.२४) रोजी विहीरीत पडल्याने बिबटया अखेर पिंज-यात अडकल्याने स्थानिक ग्रामस्थांनी निश्वास सोडला.

Web Title: Between the wells of the leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.