खबरदार...गावात प्रवेश कराल तर कारवाई; पहाटे फिरायला येणा-या नागरिकांना फलकाव्दारे इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:28 PM2020-05-03T13:28:10+5:302020-05-03T13:50:55+5:30

खबरदार...गावात प्रवेश कराल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा फलक सध्या धामणगाव आवारी गावाच्या प्रवेशद्वाराच्या दुतर्फा लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा फलक ग्रामस्थांनी लावला आहे. 

 Beware ... action if you enter the village; A warning to the citizens who come to walk in the morning | खबरदार...गावात प्रवेश कराल तर कारवाई; पहाटे फिरायला येणा-या नागरिकांना फलकाव्दारे इशारा 

खबरदार...गावात प्रवेश कराल तर कारवाई; पहाटे फिरायला येणा-या नागरिकांना फलकाव्दारे इशारा 

धामणगाव आवारी : खबरदार...गावात प्रवेश कराल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा फलक सध्या धामणगाव आवारी गावाच्या प्रवेशद्वाराच्या दुतर्फा लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा फलक ग्रामस्थांनी लावला आहे. 
अकोले शहरापासून धामणगाव आवारी हे गाव ४ ते ५ किलोमीटर आहे. अकोले शहरातील, उपनगरातील अनेक नागरिक सध्या संचारबंदीचे आणि कोरोनाबाबतच्या नियमांची पायमल्ली करून धामणगाव आवारी रस्त्याने पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गदीर्ने येतात. हे लोक पहाटे पायी चालत थेट धामणगाव आवारी गावातून पुढे निघून जातात. हे लक्षात घेऊन  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धामणगाव आवारी ग्रामपंचायतीने गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा फलक लावून पहाटे फिरायला येणाºया नागरिकांनी आमच्या गावातून प्रवेश केला तर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.
 एका बाजूला सतर्क होत ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाबाबत जागरूकता दाखवत काळजी घेत आहेत. असे असताना धामणगाव रोडवर अकोले शहरातून सायंकाळी व पहाटे नियमांची पायमल्ली करत फिरायला येतात. सुशिक्षित म्हणवणा-या या लोकांना याबाबत गांभीर्य का नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


अकोले शहर व उपनगरातून पहाटे मोठ्या प्रमाणावर लोक थेट आमच्या गावातून चालत पुढे फेरफटका मारत असतात. त्यांना वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत. तरी पोलिसांनी पहाटे व सायंकाळी धामणगाव रोड भागात गस्त वाढवावी, अशी मागणी धामणगाव आवारीचे सरपंच किसन आवारी यांनी केली आहे. 

Web Title:  Beware ... action if you enter the village; A warning to the citizens who come to walk in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.