शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:49+5:302021-01-09T04:16:49+5:30

नेवासा : देश-विदेशात लौकिक असलेल्या शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर ...

Bhagwat Bankar as the President of Shaneeshwar Devasthan | शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर

शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर

नेवासा : देश-विदेशात लौकिक असलेल्या शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची सर्वानुमते निवड झाली.

कोषाध्यक्षपदी दीपक दरंदले, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, चिटणीसपदी आप्पासाहेब शेटे यांची निवड झाली. शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर देवस्थानच्या सभागृहात शुक्रवारी (दि.८) सकाळी नवनियुक्त विश्वस्तांची नूतन पदाधिकारी निवडीसाठी बैठक पार पडली. अध्यक्षपदाच्या नावाची सूचना आप्पासाहेब शेटे यांनी केली. त्यास विकास बानकर यांनी अनुमोदन दिले.

श्री शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या निवडी २३ डिसेंबर रोजी जाहीर झाल्या होत्या. अकरा विश्वस्तपदासाठी एकूण ८४ ग्रामस्थांनी नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करून मुलाखती दिल्या होत्या.

ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख व मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे काम सुरू आहे. देवस्थान ग्रामस्थांच्या हातून थेट सरकारजमा व्हावे यासाठी काहींनी प्रयत्न केला होता. मात्र, देवस्थानचे मार्गदर्शक शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिंगणापूर ग्रामस्थांचा हक्क व अधिकार अबाधित राहावा यासाठी देवस्थानच्या विश्वस्तांच्या निवडी ग्रामस्थांमधूनच रूढी व परंपरेनुसारच व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसारच ग्रामस्थांचा हक्क अबाधित ठेवत देवस्थानच्या रूढी व परंपरेनुसार ग्रामस्थांमधून विश्वस्तांच्या निवडी जाहीर झाल्या.

नूतन पदाधिकारी निवड बैठकीस बाळासाहेब बोरुडे, विकास बानकर, छबुराव भूतकर, पोपट कुऱ्हाट , शहाराम दरंदले, भागवत बानकर, सुनिता आढाव, दीपक दरंदले, शिवाजी दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, आप्पासाहेब शेटे या विश्वस्तांसह देवस्थानचे सहकार्यकारी अधिकारी गोरख दरंदले उपस्थित होते.

----

मुख्यमंत्र्यांनी देवस्थानची परंपरा कायम ठेवली..

जुन्या-जाणत्या लोकांनी देवस्थानची सुरू केलेली परंपरा कायम ठेवण्याचे मोठे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा आणखी विकास करू. तसेच शनिभक्तांना जास्तीत-जास्त व चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही देवस्थानचे नूतन अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

फोटो : ०८ शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अध्यक्ष भागवत बानकर यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Bhagwat Bankar as the President of Shaneeshwar Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.