आशियाई कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडने पटकावले कांस्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 02:43 PM2019-07-06T14:43:34+5:302019-07-06T14:43:39+5:30
कझागिस्तान मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियन सबजुनिअर कुस्ती स्पर्धेमध्ये 61 किलो वजनी गटात भाग्यश्री फंड हीने कांस्यपदक पटकविले.
श्रीगोंदा : कझागिस्तान मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियन सबजुनिअर कुस्ती स्पर्धेमध्ये 61 किलो वजनी गटात भाग्यश्री फंड हीने कांस्यपदक पटकविले. भाग्यश्री फंड हिला भारतीय महिला कुस्ती टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
भाग्यश्रीने पहिल्या फेरीत चीनची मल्ल झागी वाय हीला 10 विरूध्द 0 गुणांनी पराभूत केले. दुस-या फेरीत जपानची इचूंदा हिच्यावर 6 विरूद्ध 0 गुणांनी मात केली. तिस-या फेरीत मात्र उझबेकीसतानची सोबीरोवा हीने भाग्यश्रीला पराभूत केले. या पराभवामुळे भाग्यश्रीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील माझी दुसरी स्पर्धा होती. जपानमध्ये मला रौप्यपदक तर कझागिस्तान कांस्यपदक मिळाले आहे. पुढे अधिक कष्ट घेऊन भारतवासीयांचे स्वप्न साकार करण्याचा विश्वास आहे ’’ अशी प्रतिक्रिया भाग्यश्री फंड हीने लोकमतला दिली.