भंडारदरा धरण ५० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:53 PM2020-08-01T16:53:33+5:302020-08-01T16:54:13+5:30
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी यावर्षी धरणात पाणीसाठा शिल्लक होता. दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात आलेल्या नवीन पाण्यामुळे भंडारदरा धरण शनिवारी (१ आॅगस्ट) ५० टक्के भरले.
राजूर : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी यावर्षी धरणातपाणीसाठा शिल्लक होता. दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात आलेल्या नवीन पाण्यामुळे भंडारदरा धरण शनिवारी (१ आॅगस्ट) ५० टक्के भरले.
शुक्रवारी दिवसभर पावसाने या परिसरात जवळपास विश्रांती घेतली असली तरी नंतर रात्रभर रतनवाडी, भंडारदरा, पांजरे परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे शनिवारी सकाळी धरणात ७८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणातील पाणी साठा शनिवारी सकाळी ५ हजार ५०८ दशलक्ष घनफूट झाला होता.
शनिवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर १० (२०८३), रतनवाडी ६३ (१४३२), पांजरे ३१ (१२५२), वाकी १४ (७८४), भंडारदरा ३३ (१०२८) मिलिमीटर पावसाची नोंद झाली.