भनगडे, शेख यांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:36+5:302021-09-16T04:27:36+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव येथील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती आमदार लहू कानडे ...
श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव येथील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
संघटनेचे अध्यक्ष इसाक शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय भनगडे यांनी समर्थकांसह पक्षात प्रवेश केला. बुधवारी त्यांचा आमदार कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वसामान्य शेतकरी, मजूर, दिन दुबळ्यांना न्याय मिळवून देणारा काँग्रेस पक्ष आहे. आमदार कानडे यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला असे शेख व भनगडे यांनी सांगितले. भनगडे यांची तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब कोळसे, विष्णुपंत खंडागळे, कार्लस साठे, अशोक कानडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, ॲड. समीन बागवान, राजेंद्र औताडे, सतीश बोर्डे, दिलीप गलांडे, राजेंद्र कोकणे, सुरेश पवार, रमेश आव्हाड उपस्थित होते.
----------