बोरले ग्रामपंचायतीत पुन्हा भारत काकडे यांचीच सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:52+5:302021-01-20T04:21:52+5:30
बोरले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत विजय संपादन केला. यामध्ये श्रीमती मनीषा सचिन ...
बोरले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत विजय संपादन केला. यामध्ये श्रीमती मनीषा सचिन काकडे यांनी सर्वांत जास्त मतांनी निवडून येण्याचा मान मिळविला. सत्ता पुन्हा ताब्यात मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बोरले गावात विजयी उमेदवार आल्यावर ग्रामदैवत हनुमानाच्या चरणी लीन झाले. या मंडळाचे मनीषा काकडे, ऊर्मिला काकडे, श्रीमती कंकूबाई पवार, जालिंदर चव्हाण, दत्तात्रय शिंदे हे विजयी झाले.
यावेळी भारत काकडे म्हणाले, ग्रामस्थांनी गेल्या पाच वर्षांपासून आमच्यावर विश्वास दाखविला आहे. गावात केलेल्या विकासाला साथ दिली. त्यामुळे मतदारांनी सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गावामध्ये आरोग्य, पाणी, वीज व मूलभूत गरजा भागविण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे भारत काकडे यांनी सांगितले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष महादेव काकडे, उपाध्यक्ष नागेश चव्हाण, शिवाजी येवले, वाल्मीक येवले, उत्तम काकडे, रावसाहेब काकडे, विलास काकडे, संतोष काकडे, भाऊ खरसाडे, जयसिंग पवार, संभाजी पवार, अमोल पवार, अनिल काकडे, रवींद्र चव्हाण, रमेश चव्हाण, तुषार काकडे, जयहिंद काकडे, बाळू पवार, छगनराव काकडे, उद्धव चव्हाण, लहू काकडे, अभिजित काकडे, लालासाहेब काकडे, सौदागर काकडे, भुजंग चव्हाण आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
...
फोटो-१९बोरले ग्रामपंचायत
...
ओळी- बोरले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलने बाजी मारल्यावर जल्लोष करताना पॅनलप्रमुख भरत काकडे आदी.