ठका गांगड आदिवासी भागाचे भारतरत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:22 AM2021-02-11T04:22:45+5:302021-02-11T04:22:45+5:30
उडदावणे येथील कलाकार ठका बाबा गांगड यांच्या द्वितीय स्मृतिदिना बुधवारी पार पडला. यावेळी भंडारदरा परिसरातील नऊ गावांनी आयोजित केलेल्या ...
उडदावणे येथील कलाकार ठका बाबा गांगड यांच्या द्वितीय स्मृतिदिना बुधवारी पार पडला. यावेळी भंडारदरा परिसरातील नऊ गावांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार गांगड बोलत होते. अध्यक्षस्थानी आदिवासी नोकरदार संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खाकर होते. यावेळी अकोल्याच्या माजी सभापती रंजना मेंगाळ, माजी उपसभापती मारुती मेंगाळ, गणेश रणदिवे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे, भरत मेंगाळ, बच्यू गांगाड, पांडुरंग भांगरे, संतोष परते, देविदास खडके, डॉ.वैद्य, स्वप्नील धांडे आदी उपस्थित होते.
स्वर्गीय ठका बाबा गांगड यांचे स्मारक होण्यासाठी आदिवासी, ठाकर, ठाकूर समाजाणे संघटितपणे काम करून हे स्मारक उभारण्यासाठी जीवाचे रान करेल, असा विश्वास आदिवासी नोकरदार संघटनेचे राज्य अध्यक्ष अरुण खाकर यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्तविक ठाकर समाजाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ उघडे यांनी केले. रामकृष्ण मधे यांनी सूत्रसंचलन केले. सखाराम गांगडं यांनी आभार मानले.