कोपर्डी येथे पिडीतेला वाहिली सामुदायिक श्रध्दांजली , संभाजी ब्रिगेडने जाळले भैयुजी महारांजाचे पुतळे
By Admin | Published: July 13, 2017 01:37 PM2017-07-13T13:37:49+5:302017-07-13T13:37:49+5:30
त्यानिमित्ताने पिडीतेला आज सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यातील मराठा संघटनांचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमत आॅनलाइन
कोपर्डी (अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील कोपर्र्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेस आज एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्ताने पिडीतेला आज सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यातील मराठा संघटनांचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
पिडीतेच्या आई-वडीलांनी पसायदानाने श्रध्दाजली वाहीली. यावेळी समाधीला पिडीतेचा फोटो लावण्यात आला होता. फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. थोड्याच वेळात सकल मराठा समाजाचा मेळावा सुरु होणार आहे. यामध्ये आॅगस्ट क्रांतीदिना (९ आॅगस्ट २०१७) पासून काढण्यात येणा-या मराठा मोर्र्चा विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. कायदा व सुवव्यस्थेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
संभाजी ब्रिगेडने जाळले भैयुजी महारांजाचे पुतळे :
कोपर्र्डी येथे उभारलेल्या स्मारकाला संभाजी ब्रिगेड व छावा संघटनेने कडाडून विरोध केला. आज या स्मारकाचे युगंधरा असे नामकरण करुन अनावरण भैयुजी महाराज यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात येणार होते. मात्र या संघटनांनी विरोध केला. कर्जत व परिसरात भैयुजी महाराज यांचे पुतळे जाळण्यात आले. त्यामुळे भैयुजी महाराज यांनी कोपर्र्डी येथे येणे टाळले. श्रध्दांजली म्हणून कोपर्र्डीत स्मारक उभारण्यापेक्षा शाळा, वसतिगृह किंवा इतर उपयोगी सुविधा निर्र्माण करा असे संघटनांचे म्हणणे आहे. श्रध्दांजली अर्पण करतेवेळी पिडीतेच्या वडीलांनी हे स्मारक नसून समाधी असल्याचे सांगितले.