भावीनिमगावच्या जगदंबेचा यात्रोत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:49+5:302021-04-25T04:19:49+5:30
दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. यावर्षी चैत्र पौर्णिमा मंगळवार, दि. २७ ...
दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे.
यावर्षी चैत्र पौर्णिमा मंगळवार, दि. २७ रोजी आहे. जगदंबेच्या मंदिरातील पुजारी दरवर्षीप्रमाणे सर्व विधी पार पाडणार आहेत. मात्र सकाळी येणाऱ्या कावडी, नवसपूर्तीसाठी मंदिरात होणारा आंबील वाटपाचा कार्यक्रम, जळत्या विस्तवावरून चालण्याची (रहाड) व 'भंदे'चा कार्यक्रम, गावातून देवीची सवाद्य पालखी (छबिना) मिरवणूक, शोभेच्या दारूची उधळण, जंगी कुस्त्यांचा हगामा हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
.........
चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंतीनिमित्त तालुक्यात होणाऱ्या सर्व यात्रोत्सव रद्द करण्यात आलेले आहेत. तसेच इतर धार्मिक कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
-अर्चना पागिरे, तहसीलदार, शेवगाव