भिमा कोरेगाव प्रकरणाचा तपास हा राज्य शासनाकडेच असावा - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 10:30 PM2020-02-14T22:30:08+5:302020-02-14T22:31:17+5:30
भिमा कोरेगाव प्रकरणाचा पोलिस तपास लावणे हा अधिकार राज्य शासनाचाच आहे. त्याबाबत आमचे मत पक्के आहे.
संगमनेर : भिमा कोरेगाव प्रकरणाचा पोलिस तपास लावणे हा अधिकार राज्य शासनाचाच आहे. त्याबाबत आमचे मत पक्के आहे. हा तपास उद्या परस्पर केंद्रशासनाच्या एजन्सीकडे जाण्यास सुरुवात होईल. मात्र ते राज्य शासनासाठी योग्य नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मध्य प्रदेशाच्या घटनेबाबत भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून त्याबाबत राजकारण करत असल्याचे मला वाटत आहे. मात्र त्या संदर्भात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी त्याबाबत खुलासाही केला आहे. त्यामुळे यावर आणखीन काय खुलासा करण्याची गरज नाही. राष्ट्रीय स्वयंसंघ हा सातत्याने प्रचार करण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न करत असतो. परंतु ज्या ठिकाणी विद्येचे माहेर घर आहे, त्याठिकाणी तरी हे तत्वज्ञान नको. कारण तिथे आपल्या राज्य घटनेला अभिप्रेत असणार्याच तत्वज्ञानावर विचार व्हावा. त्यावर चर्चा व्हावी, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे पुणे विद्यापिठात हा प्रकार होवू नये या मतावर आम्ही ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.