नगर-दौंड रोडवरील भीमा नदीचा पूल तीन दिवसानंतर खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 06:20 PM2019-08-07T18:20:27+5:302019-08-07T18:20:43+5:30

निमगाव खलू येथील नगर दौड रोडवरील भीमा नदी पूल तीन दिवसापासून पाण्याखाली गेला होता

Bhima river bridge on Nagar-Daund Road opened after three days | नगर-दौंड रोडवरील भीमा नदीचा पूल तीन दिवसानंतर खुला

नगर-दौंड रोडवरील भीमा नदीचा पूल तीन दिवसानंतर खुला

श्रीगोंदा : निमगाव खलू येथील नगर दौड रोडवरील भीमा नदी पूल तीन दिवसापासून पाण्याखाली गेला होता. आज पहाटे नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने या पुलावरून बंद असणारी वाहतूक आज सकाळी अकरा वाजल्यापासून पुर्ववत सुरू झाली.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने भीमा घोड नदीवरील सर्व पुल पाण्याखाली गेले होते. मंगळवारी रात्री भीमा व घोडचा पुर ओसरण्यास सुरुवात झाली. नगर- दौंड रस्त्यावरील निमगाव खलू येथील पुलावर ही चार फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. आज पहाटेच्या दरम्यान पुलावरून वाहणारे पाणी बंद झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Web Title: Bhima river bridge on Nagar-Daund Road opened after three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.