दीड महिन्यानंतर भिंगारला वाहतुकीची कोंडी; फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:29 AM2020-05-05T11:29:51+5:302020-05-05T11:30:46+5:30
कोरोनाच्या संदर्भात जिल्हाधिका-यांनी लॉकडाऊनच्या नियमात शिथीलता दिल्याने सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने सुरू झाले. त्यामुळे मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने भिंगारमधून जाणा-या नगर-पाथर्डी रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती.
भिंगार : कोरोनाच्या संदर्भात जिल्हाधिका-यांनी लॉकडाऊनच्या नियमात शिथीलता दिल्याने सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने सुरू झाले. त्यामुळे मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने भिंगारमधून जाणा-या नगर-पाथर्डी रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. तब्बल दीड महिन्यानंतर या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ पहायला मिळाली.
नगर-पाथर्डी रोडवरील भिंगार वेस, अर्बन बँक, विजय लाईन चौकात मंगळवारी सकाळी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यामुळे भिंगारमध्ये अनेक ठिकाणी गर्दी झाल्याने फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.
भिंगार शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली. कोरोनाच्या संदर्भात नियमात शिथीलता केली असली तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणा व पोलिसांकडून करण्यात येत आहे.