चोरी रोखण्यासाठी बसस्थानकावर लावले भोंगे; सुरक्षेबाबत करणार सूचना
By अण्णा नवथर | Published: November 25, 2023 06:28 PM2023-11-25T18:28:33+5:302023-11-25T18:28:40+5:30
शहरातील पुणे व माळीवाडा हे बसस्थानक कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात.
अहमदनगर: नगर शहरातील पुणे व माळीवाडा बसस्थानकात वारंवार चोऱ्या होतात. चोऱ्या रोखण्यासाठी कोतवाली पोलिसांनी बसस्थानकावर ध्वनीक्षपक बसवून त्याव्दारे पोलिस प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सूचना करणार आहेत. त्यामुळे बसस्थानकावर होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
शहरातील पुणे व माळीवाडा हे बसस्थानक कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. या दोनही पोलिस ठाण्यात प्रवाशांची नेहमी गर्दी असते. गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढताना मोबाइल, पर्स, सोन्याचे दागिने, लॅपटॉप, यासारख्या चोऱ्या होतात. यापूर्वी कोतवाली पोलिसांनी आरोपींना अटकही केली. पण, चोरी होऊ नये , यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून बसस्थनाक व्यवस्थापनास दोन ध्वनीक्षपके देण्यात आली आहेत.
तसेच बसस्थानकात कायम स्वरुपी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून, हे पोलिस ध्नीक्षपकाव्दारे प्रवाशांना सूचना करणार आहेत. माळीवाडा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीची घटना मध्यंतरी घडली होती. दिवाळीच्या काळात बसस्थानकात प्रवाशांची लुट झाली. त्यामुळे ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगिततले.