लष्करात निवड झालेल्या भूमिपुत्रांचा शेवगावात सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:32+5:302020-12-23T04:17:32+5:30

शेवगाव : तालुक्यातील वरूर बु. येथे भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकांचा तसेच कोरोना संकट काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कोरोना योद्धा ...

Bhumiputras selected in the army honored in Shevgaon | लष्करात निवड झालेल्या भूमिपुत्रांचा शेवगावात सन्मान

लष्करात निवड झालेल्या भूमिपुत्रांचा शेवगावात सन्मान

शेवगाव : तालुक्यातील वरूर बु. येथे भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकांचा तसेच कोरोना संकट काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कोरोना योद्धा म्हणून कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सतीश पावरा, माजी प्राचार्य दिलीप फलके, प्रा. किसन माने, माजी सरपंच विष्णू म्हस्के, मेजर अन्वर शेख आदी प्रमुख पाहुणे होते. येथील अभिनव फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी यासाठी आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कार्तिकी म्हस्के, तुषार शिंदे, गीता म्हस्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल शुभम पाचरणे, कृष्णा देशमुख या गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. लष्करात निवड झालेले योगेश म्हस्के, सचिन गावडे, महेश दळे, अमोल केदार, सोमनाथ लाड, नितीन मिसाळ यांना गौरविण्यात आले.

डॉ. राजेंद्र कोठुळे, डॉ. गजेंद्र खांबट, डॉ. सूर्यकांत पिसे, सुनीता चव्हाण, ज्योती तुजारे, मीना उभेदळ, सुनील काकडे, नीलेश मोरे यांचा कोरोना काळातील विशेष सेवेबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक सचिन म्हस्के, सूत्रसंचालन नीलेश मोरे यांनी केले. भाऊसाहेब पाचरणे यांनी आभार मानले. यावेळी सरपंच वैभव पुरनाळे, रविराज फलके, श्रीकांत मुरदारे, संदीप दरवडे, राजेंद्र नागरगोजे, गोपाळ खांबट, मनोहर कर्डिले, अक्षय डांगरे, शिक्षक आबासाहेब बेडके, आत्माराम म्हस्के, प्रवीण म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, एकनाथ म्हस्के, हमीद शेख, रवी मोरे, गणेश मोरे, महेश म्हस्के, अभिषेक खडके, किरण म्हस्के, विकास म्हस्के, स्वानंद पालवे, अविनाश म्हस्के आदी उपस्थित होते.

फोटो : २२ शेवगाव सन्मान

शेवगाव येथे लष्करात निवड झालेल्या भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Bhumiputras selected in the army honored in Shevgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.