शेवगावच्या भूमिपुत्रांनी जमा केला दीड लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:38+5:302021-05-13T04:20:38+5:30
शेवगाव : येथील देशासह विदेशात विविध ठिकाणी असलेल्या भारदे हायस्कूल व न्यू आर्ट कॉलेजमधील १९९८ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी (भूमिपुत्र) ...
शेवगाव : येथील देशासह विदेशात विविध ठिकाणी असलेल्या भारदे हायस्कूल व न्यू आर्ट कॉलेजमधील १९९८ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी (भूमिपुत्र) दीड लाखाचा मदतनिधी जमा केला आहे. त्यांनी ऑक्सिजन सिलिंडर, औषधे, उपकरणे, सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
१९९८ सालच्या दहावीच्या ४६ माजी विद्यार्थ्यांनी कोविड केअर सेंटरला ही मदत दिली. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनावर होणारा खर्च टाळून त्यांनी निधी जमविला. कोविड केअर सेंटरसाठी लागणारे अत्यावश्यक औषधे, साहित्य, उपकरणे तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, डॉ. दीपक परदेशी, आदी उपस्थित होते.
ज्योत्स्ना खंडागळे, सारिका राजेभोसले (दुबई), माया मुळे, डॉ. श्वेता फडके, आरती मुनोत, डॉ. अर्चना हुशार, रवींद्र वांडेकर, नितीन लवांडे, किरण दहीफळे, भाऊ बैरागी, अजय वाल्हेकर, नीलेश धूत, सूरज लांडे, महादेव शिंदे, विशाल गर्जे, शिवराम बेडके (अमेरिका), अमोल लांडे, दत्ता घवले, प्रमोद शर्मा, हेमंत शिनगारे, अविनाश बडधे, सचिन नाईक, राकेश पुरोहित, सचिन देशमुख, रोहित खिरोडे, मनीष वराडे, सुनील जवरे, बाबू बुधंवत, आशुतोष डहाळे, नितीन लोढे, डॉ. प्रवीण ठोकळ, प्रशांत मराठे, निसार बागावान, (सौदी अरेबिया)संजय कुलकर्णी, श्रीकांत विखे, गौतम कुलकर्णी (कॅनडा), सोमनाथ मुंडलिक, प्रवीण वाघ, विनायक पांगरे, कौस्तुभ भारदे, सुनील घवले, श्रीकांत गोरे, अतुल रासने, प्रकाश पाटील, पप्पू ढाकणे, सचिन शिरसाठ, डॉ. संदीप चोपडे, आदींनी योगदान दिले आहे.