कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:09 PM2019-12-08T18:09:57+5:302019-12-08T18:10:45+5:30
कासार पिंपळगाव परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातील ग्रामस्थ नामदेव राजळे अचानकपणे बिबट्या गावातील कवळेवस्ती येथे दिसला असल्याची माहिती गावातील नागरिकांना दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातील ग्रामस्थ नामदेव राजळे अचानकपणे बिबट्या गावातील कवळेवस्ती येथे दिसला असल्याची माहिती गावातील नागरिकांना दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
ग्रामस्थांनी वनविभागाचे कर्मचारी यांना याबाबत गावात बिबट्या आल्याची माहिती दिली असता वनविभागाच्या कर्मचा-यांनी गावात येवून शेत शिवारात बिबट्याच्या पायाच्या उमटलेले ठसे तपासून पाहिले. यावरुन गावात बिबट्या आल्याची माहिती खरी ठरली. त्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास मुळा कॉलनी शेजारी बिबट्याचा आवाज ग्रामस्थांना ऐकू आला. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. काही लोकांनी गावात फटाके वाजून बिबट्याला गावाबाहेर पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा आहे. तरी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.