कांद्याच्या भावात मोठी घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:29 PM2020-06-27T16:29:01+5:302020-06-27T16:29:43+5:30
श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी झालेल्या लिलावात १६ हजार ५३ कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावात मात्र घसरण झाली.
श्रीरामपूर : बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी झालेल्या लिलावात १६ हजार ५३ कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावात मात्र घसरण झाली.
शुक्रवारी झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्यास ६०० ते ८००, दोन नंबरच्या कांद्यास ३७० ते ३५०, तीन नंबरच्या कांद्यास १०० ते २५०, गोल्टी कांद्यास ३०० ते ५०० व जोड कांद्यास १०० ते १५० भाव मिळाला.
पावसामुळे चाळीतला कांदा खराब होऊन नुकसान होईल या भितीने कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीस आणत आहेत. कांद्याचे बाजारभाव गत सप्ताहापेक्षा सुमारे १५० रुपयांनी कमी झाले. कांद्याची आवक वाढली असून रवानगी तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यात होत आहे.