सार्वजनिक ठिकाणी केलं बर्थडे सेलिब्रेशन, 35 जणांविरोधात दाखल झाला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:17 PM2020-06-16T12:17:06+5:302020-06-16T12:17:15+5:30
अहमदनगर: गदीर्बाबत प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी असतानाही नगरमध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्ते नेहमीप्रमाणे बर्थडे सेलिब्रेशन करून सोशल डिस्टंसिंगला तिलांजली देत आहेत.
अहमदनगर: गदीर्बाबत प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी असतानाही नगरमध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्ते नेहमीप्रमाणे बर्थडे सेलिब्रेशन करून सोशल डिस्टंसिंगला तिलांजली देत आहेत.
भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढलेले विनय वाखुरे यांनी 13 जून रोजी शहरातील प्रोफेसर चौक परिसरात गर्दीत आपला वाढदिवस साजरा केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात विनय वाखुरे यांच्यासह अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयुर कुलकर्णी व निखिल मोयल व इतर 30 ते 35 जणांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक अजय गव्हाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. वाखुरे यांनी मात्र कुठलीही परवानगी न घेता प्रोफेसर चौकातील अबेदिन पेंट्स येथे एकत्र जमून वाढदिवस साजरा करत शासकीय आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मंगेश खरमाळे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असताना मास्क न घातल्याने त्यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.