वाढदिवसानिमित्त कोरोनाबाधितांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:08+5:302021-05-05T04:33:08+5:30
ढवळगाव : सोन्या-चांदीचे व्यापारी धरमचंद फुलफगर यांनी सामाजिक बांधीलकी जपत शिरूर येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोनाबाधित ...
ढवळगाव : सोन्या-चांदीचे व्यापारी धरमचंद फुलफगर यांनी सामाजिक बांधीलकी जपत शिरूर येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोनाबाधित मुली व कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
शिरूर येथील शासकीय विशेष मुलीच्या संस्थेतील ४८ मुली व ९ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. एकाचवेळी संस्थेतील इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित झाल्याने संस्था हवालदिल झाली. संस्थेतील मुलींसाठी भोजनाची व्यवस्था करणारेदेखील कोरोना झाल्याने या मुलींसह कर्मचाऱ्यांची भोजन व्यवस्था अडचणीत आली. यावेळी फुलफगर यांच्याशी संपर्क साधून या मुलींच्या भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. सामाजिक बांधीलकी जपणारे फुलफगर हे सातत्याने उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. यामुळे फुलफगर यांनी भोजन देण्याची तयारी दर्शविली. २९ एप्रिलला फुलफगर यांचा वाढदिवस असतो. ते दरवर्षी विधायक काम करूनच वाढतदिवस साजरा करतात. यंदा कोरोनाच्या वातावरणात आपल्याला असे विधायक काम करण्यास मिळेल की नाही, अशी शंका त्यांच्या मनात होती. मात्र, वाढदिवसाच्या दोनच दिवस अगोदर फुलफगर यांना विशेष मुलींना मदत करण्याची संधी मिळाली. त्यामुळे यंदाही माझा वाढदिवस सार्थकी लागला, अशी भावना फुलफगर यांनी व्यक्त केली.
---
०३ धरमचंद फुलफगर