बी.जे. खताळ पाटलांच्या १०२व्या जयंतीनिमित्त ग्रंथभेट उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:01+5:302021-03-27T04:21:01+5:30

१९६२ ते १९८५ या काळात संगमनेर तालुक्याचे आमदार म्हणून आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून खताळ यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम ...

B.J. Book visit on the occasion of 102nd birth anniversary of Khatal Patil | बी.जे. खताळ पाटलांच्या १०२व्या जयंतीनिमित्त ग्रंथभेट उपक्रम

बी.जे. खताळ पाटलांच्या १०२व्या जयंतीनिमित्त ग्रंथभेट उपक्रम

१९६२ ते १९८५ या काळात संगमनेर तालुक्याचे आमदार म्हणून आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून खताळ यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम पाहिले. महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक प्रकल्प त्यांच्या काळात उभे राहिले. कमालीची शिस्त, प्रामाणिकपणा आणि तत्त्वनिष्ठा यामुळे त्यांची सर्वदूर एक वेगळी ओळख होती. खताळ यांच्या १०२व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेली वाळ्याची शाळा, अंतरीचे धावे, गांधीजी असते, तर गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, माझे शिक्षक आणि लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान ही पुस्तके राज्यातील १०२ व्यक्ती आणि संस्थाना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ.राजेंद्र खताळ, डॉ.संतोष खेडलेकर यांनी दिली. शहरातील पेटीट विद्यालयाचे ग्रंथपाल खंडू सांगळे, सुनील नवले यांना प्रातिनिधिक स्वरूपात खताळ यांनी लिहिलेली पुस्तके प्रदान करण्यात आली. डॉ.राजेंद्र खताळ. विजया खताळ. डॉ.संतोष खेडलेकर उपस्थित होते.

Web Title: B.J. Book visit on the occasion of 102nd birth anniversary of Khatal Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.