अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवारांची न्यायालयात धाव
By Admin | Published: May 9, 2017 02:29 PM2017-05-09T14:29:03+5:302017-05-09T14:29:03+5:30
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने अधिकृत केलेल्या पयार्यी उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने भाजपच्या चार उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.
आ नलाइन लोकमत, नेवासा(अहमदनगर) दि.९-नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने अधिकृत केलेल्या पयार्यी उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने भाजपच्या चार उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यात आले आहे. नेवासा नगर पंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज व एबी फॉर्म जमा करण्यासाठी २८ एप्रिल ते ५ मे दरम्यान मुदत होती. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवांसाठी एबी फॉर्म देताना नबंर एक व नंबर दोन असे फॉर्म जमा केले होते. नंबर एकचा अधिकृत उमेदवार असून जर या उमेदवाराचा छाननी मध्ये बाद झाला अथवा अर्ज माघारीच्या दिवशी मागे घेतला तर त्यासाठी नंबर दोन हा पर्याय जोडला होता. भाजपाने प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना नंबर एक व नंबर दोन असे एबी फॉर्म दिले. उमेदवारी अजार्ची छाननी ६ मे रोजी झाली. निवडणूक निर्णय अधिका-यांनी नंबर एकचा एबी फॉर्म असणारा उमेदवार वैध ठरवून नंबर दोनचे उमेदवार अवैध ठरवले. काही ठिकाणी अन्य कारणामुळे नंबर एकचा फॉर्म बाद झाला. त्याठीकाणी नंबर दोनचा एबी फार्मचा अर्ज नामंजूर केल्याने बाद झालेल्या पयार्यी उमेदवार वापरण्याचा हक्क भाजपाकडून हिरावल्याने भाजपाच्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.भाजपचे प्रभाग ११ मधील पयार्यी उमेदवार अॅड. संजीव शिंदे, प्रभाग १७ मधील पयार्यी उमेदवार शांताबाई अंबादास पवार, प्रभाग तीन मधील पयार्यी उमेदवार कृष्णा परदेशी, प्रभाग १६ मधील पयार्यी उमेदवार शिवाजी राजगिरे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे.