कर्जतमध्ये भाजपची गळती सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:03+5:302021-01-09T04:17:03+5:30
कर्जत : तालुक्यात भाजपची गळती सुरूच असून, तीन नगरसेवकांपाठोपाठ जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ...
कर्जत : तालुक्यात भाजपची गळती सुरूच असून, तीन नगरसेवकांपाठोपाठ जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षातील वाढत्या मतभेदांमुळे राजीनामा दिल्याचे समजते.
भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे व जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांच्याकडे त्यांनी पदाचा राजीनामा दिला. अशोक खेडकर यांनी यापूर्वी शिवसेनेचे तालुकाप्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, भाजपचे तालुकाध्यक्ष, अशी पदे उपभोगली आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतरचे कर्जत- जामखेड तालुक्यातील भाजपमधील पुढे आलेले गटतट, मतभेद, माजी मंत्री राम शिंदे यांच्या पराभवास जबाबदार कोण, यावरून होत असलेल्या चर्चा, मतदारसंघातील नेत्या- नेत्यांमधील अबोला, भाजपचा जिल्हाध्यक्ष निवडताना झालेला संघर्ष या सर्व गोष्टींचा विचार करता खेडकर यांच्या राजीनाम्यामागेही पक्षातील अंतर्गत कलह असेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी कर्जतचे नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी, तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, युवा नेते सचिन सोनमाळी यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. खेडकर यांच्या पत्नी सुनीता खेडकर या जिल्हा परिषद सदस्या आहेत.
----
घरगुती कारणातून राजीनामा
घरगुती कारणातून भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे अशोक खेडकर यांनी सांगितले. घरगुती कारणातून भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे अशोक खेडकर यांनी सांगितले.
फोटो : ०९ अशोक खेडकर