मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी शिर्डीत भाजपाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:10 PM2020-10-13T12:10:03+5:302020-10-13T12:10:59+5:30
मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. शिर्डीमध्ये देखील लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे.
शिर्डी : मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. शिर्डीमध्ये देखील लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी (दि.१३ आॅक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मैदानात उपोषण सुरू करण्यात आले आहे. सध्या साधूसंत भजन-कीर्तनात मग्न आहेत. या आंदोलनात महंत सुधीरदास महाराज, भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजय महाराज धोंडगे, सुदर्शन महाराज कपाटे, आचार्य जिनेन्द्र जैन, प्रकाश महाराज गंगवाल, बबनराव मुठे, बालम भाई इनामदार आदी व्यासपीठावर आहेत.
मंगळवारी दुपारी दोन वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.