शिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा
By | Published: December 5, 2020 04:39 AM2020-12-05T04:39:40+5:302020-12-05T04:39:40+5:30
पुढील वर्षअखेर निवडणुका होत असल्याने गोंदकर यांना जवळपास अकरा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. अर्चना कोते यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त ...
पुढील वर्षअखेर निवडणुका होत असल्याने गोंदकर यांना जवळपास अकरा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
अर्चना कोते यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी निवड प्रक्रिया होणार होती. माजी उपनगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व जगन्नाथ गोंदकर, तसेच माजी नगराध्यक्षा अनिता विजय जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, आज अखेरच्या दिवशी अनिता जगताप व जगन्नाथ गोंदकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे शिवाजी गोंदकर यांची निवड निश्चित झाली.
युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ते नगराध्यक्ष, असा प्रवास असणारे शिवाजी गोंदकर नगरपंचायतच्या स्थापनेपासून नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वी उपनगराध्यक्षपदही भूषवलेले आहे. संघ परिवाराशी निगडित असलेल्या गोंदकर परिवारातील शिवाजी गोंदकर यांच्यावर सध्या भाजपच्या उद्योग आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राच्या समन्वयकाची जबाबदारी आहे.
कोट -
निवडणुकीत दोन्हीही प्रमुख उमेदवार भाजपचे होते. सहमतीने जगन्नाथ गोंदकर यांनी अर्ज मागे घेतला. पुढील वर्षअखेर नगरपंचायतची निवडणूक होत आहे.
-राजेंद्र गोंदकर, भाजप जिल्हाध्यक्ष