नेवासा येथे भाजप सरकारचा निषेध : राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:09 PM2018-08-31T13:09:09+5:302018-08-31T13:09:26+5:30

पेट्रोल-डिझेल दरवाढी संदर्भात नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज नेवासा तहसीलदारांना निवेदन देऊन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

BJP government protests at Nevasa: NCP's request for Tehsildar | नेवासा येथे भाजप सरकारचा निषेध : राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

नेवासा येथे भाजप सरकारचा निषेध : राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

नेवासा : पेट्रोल-डिझेल दरवाढी संदर्भात नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज नेवासा तहसीलदारांना निवेदन देऊन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. निवासी नायब तहसिलदार नारायण कोरडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पेट्रोल व डिझेलचे दर आतंरराष्ट्रीय बाजार पेठेत कमी असतांना दर कमी आकाराने आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही ही दरवाढ त्वरित कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला.
यावेळी विठ्ठलराव लंघे म्हणाले, भाजपच्या सरकारने पेट्रोल डिझेलची दरवाढ केल्याने सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. आज शेतक-यापासून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यत सर्वांना दुचाकी चार चाकी वाहनाने रोजी रोटीसाठी व आपल्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागते. आज त्यांना मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने गगनाला भिडलेली ही दरवाढ त्वरित कमी करावी, अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, सरचिटणीस गणेश गव्हाणे, शहराध्यक्ष गफूर बागवान, डॉ.अशोकराव ढगे यांनी निषेध नोंदवला. यावेळी गणेश गव्हाणे, योगेश रासने, अनिल हापसे, जनार्धन पटारे, अशोक कर्डक, ज्ञानेश्वर आरगडे, फिलिप वडागळे, सनी साळवे, माऊली गारुळे, विष्णू नवसे, अतुल मते, अनिल गायके, मंगेश निकम, प्रविण घुले, सुरेश ढोकणे, बाळासाहेब आरगडे, शिवाजी आगळे, राजू वडागळे, अर्जुन कापसे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP government protests at Nevasa: NCP's request for Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.