भाजप सरकार अण्णांचा जे. डी. अग्रवाल करतील : जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केली भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:41 AM2019-02-04T11:41:30+5:302019-02-04T11:42:15+5:30

हे सरकार अण्णाचा जे. डी. अग्रवाल करतील. गंगा आंदोलनात ज्या पद्धतीने जे. डी. यांचा बळी घेतला तशी आम्हाला भीती आहे. जे. डी. हे तर संघाचे होते़ असं असतानाही सरकारने त्यांचा बळी घेतला. हे तर आण्णा आहेत़ त्यामुळे आम्हाला भीती वाटते, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग म्हणाले.

BJP government will make JD Agarwal: Jayanti Rajendra Singh expresses fear | भाजप सरकार अण्णांचा जे. डी. अग्रवाल करतील : जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केली भीती

भाजप सरकार अण्णांचा जे. डी. अग्रवाल करतील : जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केली भीती

अहमदनगर : हे सरकार अण्णाचा जे. डी. अग्रवाल करतील. गंगा आंदोलनात ज्या पद्धतीने जे. डी. यांचा बळी घेतला तशी आम्हाला भीती आहे. जे. डी. हे तर संघाचे होते़ असं असतानाही सरकारने त्यांचा बळी घेतला. हे तर आण्णा आहेत़ त्यामुळे आम्हाला भीती वाटते, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग म्हणाले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे गेल्या गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु आहे. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी हे आंदोलन सुरु आहे़ सोमवारी अण्णांची जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, नंदूरबार येथील आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असिम सरोदे यांनी भेट घेतली.
राजेंद्र सिंग व विश्वंभर चौधरी म्हणाले, सरकारकडून अण्णांच्या मागण्यांबाबत धूळफेक सुरू आहे. गिरीश महाजन येतात़ जातात़ वारी सुरूच आहे. नरेंद्र मोदींचा इगो अशा स्तरापर्यंत पोहचला आहे, की चर्चा करायला केंद्रातील एकही व्यक्ती पाठवत नाहीत. अण्णांची अवस्था जे. डी. अग्रवालांसारखी होऊ शकते. आम्हाला तीच भिती आहे. आता अण्णांनी एकच मागणी केली पाहिजे की मुख्यमंत्री किंवा केंद्रातील मंत्री चर्चेला आला पाहिजे. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करणे म्हणजे अण्णांचा अपमान आहे.

Web Title: BJP government will make JD Agarwal: Jayanti Rajendra Singh expresses fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.