नगर शहरात भाजपचा आमदार झाला नाही हीच खरी सल, विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयारीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:53 AM2020-08-04T11:53:21+5:302020-08-04T11:55:38+5:30

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. नगर शहरात भाजपाने नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, खासदार, राज्य व केंद्रीय मंत्री आदि लोकप्रतिनिधी दिले आहेत. मात्र शहराचा आमदार अद्याप भाजपचा झालेला नाही. ही सल वषार्नुवर्ष मनात आहे, अशी खंत एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. आता विधानसभेची मध्यवर्ती निवडणुकही लवकरच होणार असल्याचे भाकीतही या ज्येष्ठ नेत्याने केले. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

The BJP has not become a MLA in the city | नगर शहरात भाजपचा आमदार झाला नाही हीच खरी सल, विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयारीचा निर्धार

नगर शहरात भाजपचा आमदार झाला नाही हीच खरी सल, विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयारीचा निर्धार

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. नगर शहरात भाजपाने नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, खासदार, राज्य व केंद्रीय मंत्री आदि लोकप्रतिनिधी दिले आहेत. मात्र शहराचा आमदार अद्याप भाजपचा झालेला नाही. ही सल वषार्नुवर्ष मनात आहे, अशी खंत एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. आता विधानसभेची मध्यवर्ती निवडणुकही लवकरच होणार असल्याचे भाकीतही या ज्येष्ठ नेत्याने केले. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शहर भाजपच्या नव्या पदाधिकाºयांचा सोमवारी सायंकाळी एका संस्थेने सत्कार केला. त्यावेळी ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी याबाबतचे भाकीत वर्तवले.
शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, शहर भाजपची कार्यकारणी निवडतांना सर्वांशी सल्लामसलत करून प्रत्तेक घटकाला कार्यकारणीत स्थान दिले आहे. पक्षात जो चांगले काम करतो त्याच्या कामाची दखल पक्ष कायमच घेत असतो. त्यामुळेच तुम्हाला हे पद मिळाले आहे. पंडित दीनदयाळ पतसंस्था परिवाराने केलेला सत्कार हा प्रोत्साहन देणारा आहे.
----

उमेदवार ठरलेला नाही
सर्व भाकिते वर्तविता येतात, मग विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण, याबाबत विचारले असता लोढा म्हणाले, ते आपल्या हातात नाही. तसेच भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते किशोर डागवाले यांच्या कार्यालयासमोरच हा सत्कार झाला. मात्र ते या कार्यक्रमात सहभागी नव्हते.
 
Web Title: The BJP has not become a MLA in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.