शिवसैनिकांच्या हत्याकांडात भाजपा नेत्यांचाही हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:02 AM2018-04-09T05:02:41+5:302018-04-09T05:02:44+5:30

भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़

The BJP leaders also took part in the killing of Shivsainiks | शिवसैनिकांच्या हत्याकांडात भाजपा नेत्यांचाही हात

शिवसैनिकांच्या हत्याकांडात भाजपा नेत्यांचाही हात

अहमदनगर : भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़ त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, यासाठी सेना पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले़
महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची शनिवारी हत्या झाली. या घटनेने विभागात एकच खळबळ उडाली़ पोटनिवडणुकीत अशा प्रकारे हिंसाचार होणे व त्यात कार्यकर्त्याचा मृत्यू होणे ही बाब गंभीर असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे़ त्यात या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री दिवाकर रावते व मंत्री कदम रविवारी नगरमध्ये आले होते़ शिवसैनिकांच्या हत्याकांडाला कदम यांनी पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले़ ते म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला़ त्यानंतर कार्यकर्ते जगताप यांना घेऊन गेले़ यावरून नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची कल्पना येते़ कार्यालयावर हल्ला करणाºयांना मोक्का लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कदम म्हणाले़
पोलिसांच्या मदतीने नगर शहरात गुंडगिरी वाढली असून, यातूनच शिवसैनिकांची हत्या झाली आहे़ या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी़ कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत़ मयतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना स्वीकारत असल्याचे कदम यांनी जाहीर केले़
>भाजपाला शिवसेनेचा टेकू
गृहराज्यमंत्रिपद सेनेकडे असल्याचे पत्रकारांनी छेडले असता, गृहराज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात ते सर्वांनाच माहिती आहे़ सेना सत्तेत सहभागी नसून, सेनेने फक्त टेकू दिलेला आहे़ गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे आहे़ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे़ त्यास मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत़ या घटनेचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला जाईल, त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील, असेही कदम म्हणाले़
>राष्ट्रवादीला बदनाम
करण्याचे षड्यंत्र - पवार
कोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अहमदनगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्यांची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हे
न उलगडणारे कोडे आहे, असे सातारा येथे राष्टÑवादीच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: The BJP leaders also took part in the killing of Shivsainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.