भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:02 PM2018-04-10T17:02:21+5:302018-04-10T17:39:41+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले आहे.

BJP MLA Shivaji Kardillay's police custody extended by 2 days | भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

अहमदनगर -  पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले आहे.
केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केली. या प्रकरणी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांना सोमवारी अटक करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपल्याने कर्डिले यांना आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमार कर्डिले यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली.
याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ कार्यकर्त्यांना आतापर्यत पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आज सर्व जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी अटक असलेल्या कैलास गिरवले, शरिफ शेख, राहुल अरुण चिंतामण, अ?ॅड. प्रसन्न जोशी, सय्यद अकबर, आवेश शेख, सय्यद असिफ, सागर वाव्हळ, संजय वाल्हेकर, अनिल राऊत, अनिकेत चव्हाण, गिरीष गायकवाड, दिपक गाडीलकर, रियाज तांबोळी, दत्ता उगले, कुणाल घोलप, साईनाथ लोखंडे, सचिन गवळी, सोमनाथ गाडेकर, संतोष सुर्य वंशी, धर्मा करांडे, इम्रान शेख यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी सुरेश बनसोडे व सागर पंधाडे यांनाही अटक करण्यात आली आहे.
याशिवाय याप्रकरणी दादाभाऊ कळमकर, सचिन अरुण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखिल वारे, दादा दरेकर, गजानन भांडवलकर, मुसा सादीक शेख, सागर ठोंबरे, घनश्याम बोडखे, मतीन सय्यद, सागर डोंगरे, अफजल शेख, कुलदीप भिंगारदिवे, बबलू सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी, सुनिल त्रिंबके, दत्ता तापकीरे, अंकुश चत्तर, वैभव वाघ, सादीक अब्दुल रौफ सय्यद, मुस्सदीक सादीक सय्यद, अवधूत जाधव, राजेश परकाळे, धीरज उकीर्डे, मयूर कुलथे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता.

 

Web Title: BJP MLA Shivaji Kardillay's police custody extended by 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.