राज्य सरकारविरोधात नेवासेत भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 03:30 PM2021-03-21T15:30:15+5:302021-03-21T15:30:54+5:30
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेवासा येथे भाजपच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
नेवासा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेवासा येथे भाजपच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा संघटन चिटणीस व तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराच्या विरोधात नेवासा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या खोलेश्वर गणपती चौकात आज भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या.
नगरसेवक सुनीलराव वाघ, शहराध्यक्ष मनोज पारखे, राजेंद्र मापारी, निरंजन डहाळे, स्वप्नील मापारी, आदिनाथ पटारे, विशाल धनगर, पोपटराव शेकडे, अमोल कोलते, रमेश रोडे, किरण धनगर, प्रतिक शेजुळ, अंकुश विटकर यावेळी उपस्थित होते.
भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे म्हणाले, नुकतेच एका बंगल्याच्या बाहेर स्फोटके पेरलेली आढळली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून खंडणी गोळा करण्याचा हा प्रकार असून यात अनेक मंत्र्यांचा व सरकारचा हात असल्याचा आरोप केला.