मंत्री संजय राठोड विरोधात भाजपा महिला आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:38 AM2021-02-28T04:38:12+5:302021-02-28T04:38:12+5:30

अहमदनगर : भाजप शहर महिला आघाडीच्या वतीने येथील दिल्लीगेट चौकात मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात रास्ता रोको करत छायाचित्रासह ...

BJP Women's Front's 'Jode Maro' agitation against Minister Sanjay Rathore | मंत्री संजय राठोड विरोधात भाजपा महिला आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

मंत्री संजय राठोड विरोधात भाजपा महिला आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

अहमदनगर : भाजप शहर महिला आघाडीच्या वतीने येथील दिल्लीगेट चौकात मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात रास्ता रोको करत छायाचित्रासह ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये, प्रिया जानवे, कॅन्टोन्मेंट सदस्या साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे, ललिता कोटा, अश्‍विनी करांडे आदी महिला उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत हे आंदोलन पार पडले.

यावेळी वल्लाकटी म्हणाल्या, राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे सोडून महिलांवर अत्याचार करीत आहेत. युवतीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अद्याप राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. अत्याचारीत कुटुंबावर मंत्री राठोड दादागिरी करीत दबाव टाकत आहेत. त्यामुळे कुटुंबही घाबरलेले आहे.

फोटो

Web Title: BJP Women's Front's 'Jode Maro' agitation against Minister Sanjay Rathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.